इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या अध्यक्षपदी महादेव साळी तर सचिवपदी संजय निकम यांची निवड

इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या झालेल्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करणेत आली. यामध्ये मुद्रक संघाच्या अध्यक्षपदी महादेव साळी तर सचिवपदी संजय निकम यांची निवड करण्यात आली.
इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या त्रैवार्षिक निवड प्रक्रियेत पुढील प्रमाणे निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदी महादेव साळी, उपाध्यक्षपदी सिताराम शिंदे, सचिवपदी संजय निकम, खजिनदारपदी कलगोंडा पाटील, तर सदस्यपदी विनोद मद्यापगोळ, दीपक वस्त्रे, नरेश हरवंदे, गणेश वरुटे, स्वप्नील नाईकवडे, राकेश रुग्गे, सुधाकर बडवे, दीपक फाटक, रणजित पाटील तसेच सल्लागारपदी दिनेश कुलकर्णी, शंकर हेरवाडे, संजय आगलावे, संतराम चौगुले यांची निवड करण्यात आली.
मुद्रक संघाच्या उद्दीष्टाप्रमाणे मुद्रक बंधूसाठी नवनवीन व्यावसायिक प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये जागतिक स्तरावरील दिल्ली येथे झालेल्या प्रिटींग प्रदर्शन तसेच मुंबई येथे झालेल्या प्रिंटींग एक्झिबिशनला दोन वेळा मोठ्या संख्येने मुद्रकांना घेऊन अभ्यास दौरा करणेत आला होता. तसेच शहर व परिसरामधील मुद्रकांच्यासाठी दरवर्षी विविध मार्गदर्शनपर व्याख्यान, चर्चासत्र, रक्तदान-आरोग्य शिबीर, खेळ, सांस्कृतिक कौटुंबिक कार्यक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, मुद्रकांसाठी दीपावली भेटवस्तू वाटप, पूरग्रस्तांसाठी मदत, कोरोना काळात गरजूंना अन्यधान्य वाटप, वेळप्रसंगी वैद्यकिय उपचारासाठी मदत अशा अनेक उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
सध्याच्या मुद्रण व्यवसाया-मध्ये होत असलेल्या आधुनिक बदलाची माहिती अवगत करण्यासाठी व्यवसायातील नवनवीन बदलाची माहिती मुद्रकांना व्हावी या उद्देशाने मुद्रक संघाची स्थापना झालेली असून यासाठी मुद्रक बंधूंना एकत्र आणून नव्या प्रगतीची मोट बांधण्यात येणार आहे. आजवर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अधिवेशन होऊन बरीच वर्षे लोटली आहेत. भविष्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील राज्यस्तरीय महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अधिवेशन व प्रदर्शन इचलकरंजी वस्त्रनगरीमध्ये घेण्यासाठी आग्रही असणार आहोत असे प्रतिपादन नवीन कार्यकारिणीने व्यक्त केले आहे.