आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करा ;महाराष्ट्र घर कामगार मोलकरीण संघटना

महाराष्ट्र घर कामगार मोलकरीण संघटना आयटक वतीने 3 जानेवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोलकरीण महिला, कामगार व महिला अधिकारी यांचा अवमान करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करा यासाठी निदर्शने करण्यात आली*.
तीन दिवसापूर्वी टीव्ही 9 चॅनल वर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुलाखात दिलेले आहे की, सांगलीचे डी एस पी पालकमंत्र्यांचे कामगारासारखे काम करतात. तर सांगली जिल्ह्याचे होम डीएसपी मनीषा दुबुले पालकमंत्र्यांचा घरी धुणीभांडी करणाऱ्या महिला सारखे वागतात. अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजेच लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराने राज्यघटनेनुसार काम करण्याचे हमी देण्याचे वचन मोडलेले आहे. यासंदर्भात सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन दिले असता त्यानी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की समाजातील प्रत्येकाचे श्रम महत्त्वाचे व सन्मानाचे आहे एखाद्या श्रम करणाऱ्या समूहाबद्दल अपशब्द वापरणे चुकीचे आहे. असे सांगून त्यांनी आमदारांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
म्हणूनच हे निवेदन महाराष्ट्र शासनाकडे तातडीने पाठविण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सुमन पुजारी यांना सांगितले.
त्यानंतर सांगली जिल्ह्याचे डीएसपी गेडाम दीक्षित यांना महिला शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन दिले असता त्यांनी सांगितले प्रत्यक्षात माझ्याबद्दल हे आपले शब्द आमदारांनी वापरलेले असल्याने योग्य त्या कार्यवाहीसाठी हे निवेदन मी वरिष्ठांच्या कडे पाठवीत आहे असे त्यांनी सांगितले. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे यानिमित्ताने महाराष्ट्र बोलकं महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत असता सुमन पुजारी यांनी सांगितले की जगातील कामगारांनो एक व्हा अशी घोषणा दिली जाते कामगार वर्ग हा अत्यंत महत्त्वाचा उत्पादक श्रमिक आहे त्याच्यावर त्याच्या बद्दल जगभर आदराने बोलले जात असताना कामगारांना अपमानकारक बोलणे याबद्दल कारवाई होण्याची आवश्यकता आहे इतकेच नव्हे तर आज देशामध्ये महिलांच्या वर वाढत चाललेले अत्याचाराच्या स्थितीमध्ये शासनाच्या पोलीस खात्यामध्ये जास्तीत जास्त महिला पोलिसांची आवश्यकता आहे अशा वेळेस महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणारे वक्तव्य करणे यामुळे अत्यंत घातक कृत्य असून महिलांचा अवमान करणारी आहे म्हणूनच विनाविलंब आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे यावेळेस मी दर्शनाच्या आंदोलनामध्ये संघटनेच्या अध्यक्ष सुमन पुजारी, सचिव विद्या कांबळे, सुलोचना पाटील, सावित्री सायार, वंदना पाटील व गीता आंबी इत्यादींनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.