चलो आझाद मैदान मुंबई, दि. ०५ जानेवारी २०२२ , सकाळी १० वाजता
उर्जा खात्यातील भरती बाबत आझाद मैदान येथे आंदोलन : अमोल वेटम, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियन
उर्जा खात्यात ३६ हजार हून अधिक जागा रिक्त, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता सह इतर पदे रिक्त
०५ जानेवारी २०२२ रोजी आंदोलन
सांगली दि.०३ : राज्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती मध्ये जवळपास ३६ हजार हून अधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता सह इतर पदे रिक्त आहेत. तात्काळ सर्व रिक्त पदे भरण्यात यावेत; महापारेषण , महावितरण मध्ये सहाय्यक अभियंता या पदी गेटची सक्ती रद्द करावी; सन २०१७ पासून भरती न निघाल्यामुळे अनेक अभियंत्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे, सरकारने याबाबत विचार करावा, कंत्राटी पद्धतीने होणारी भरती थांबवावी आदी मागण्याकरिता दि.०५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदान येथे एकदिवसीय आंदोलन रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख अमोल वेटम, अक्षय गुजर यांनी दिली.
सन २०१५, २०१८ मध्ये महावितरण, २०१६ मध्ये महानिर्मिती, २०१७ मध्ये महापारेषण मधील सहाय्यक तसेच कनिष्ठ अभियंता या पदांची भरती निघाली यानंतर आजअखेर भरती निघालेली नाही. अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम, अक्षय गुजर यांनी दिली.