हमाल, माथाडी कामगार, व कष्टकरी वर्गानी वंचित बहुजन आघाडीत सहभागी व्हावे
¶¶ *डॉ.क्रांतीताई सावंत*
राज्य सदस्या,
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य.
गांधीनगर – ( प्रतिनिधी ) शेतकरी , शेतमजूर , कष्टकरी कामगार व शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरची लढाई लढत असून त्या मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या व पक्षाच्या तक्रार निवारण व समन्वय समितीच्या राज्य सदस्या डॉ.क्रांतीताई सावंत यांनी गांधीनगर येथे बोलताना व्यक्त केले.
त्या गांधीनगर येथे हमाल व माथाडी कामगार यांनी आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा विलास कांबळे हे होते.
डॉ सावंत बोलतांना पुढे म्हणाल्या की बेरोजगारी व महागाई मुळे सर्व सामान्य माणूस उद्ध्वस्त झालेला असून हमाल, कष्टकरी वर्ग व माथाडी कामगार देशोधडीला लागलेले आहेत. त्याला आधार व न्याय मिळवून देण्याचे काम श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी संपूर्ण देशभर करीत आहे. त्याना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून, येथील हमाल पंचायतिने ही बळ देण्याचे काम करावे असे आवाहन ही त्यांनी केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा महासचिव प्रा.आदिनाथ कांबळे, प्रमोद ठाणेकर, रमेश कांबळे, तानाजी काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या वेळी जिल्हा महासचिव महादेव कुंभार, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, शहर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, शहर सघटक प्रशांत कांबळे,रमेश पोवार, राजू कांबळे, चंद्रशेखर कांबळे, प्रमोद कांबळे, काशिनाथ कांबळे, प्रभाकर ठोमके, ममता साठे, लता शिरोळकर, राजेश सनदी. राजेंद्र कांबळे, प्रमोद सोराटे, सुधाकर कांबळे, सारंग कांबळे, प्रल्हाद गोंधळी, शिवाजी कांबळे, अशोक कांबळे रामचंद्र कांबळे, संदीप गोंधळी, रविंद्र कांबळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी डॉ क्रांतीताई सावंत यांच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन व नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली. प्रास्तविक व स्वागत नितीन कांबळे ( कुर्डूकर ) यांनी केले तर सूत्र संचालन दशरथ दीक्षांत यांनी केले व आभार अमित नागठीळी यांनी मानले.