रत्नागिरी : भारतीय बौद्ध महासभेच्या गावशाखा हातखंबा येथील संबोधी महिला मंडळच्या वतीने बुधवारी (ता. 3) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संबोधी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा मोहन कांबळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच दीपप्रज्वलन स्नेहल सुनील कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमात स्वराली नितीन कांबळे, सुजल नितीन कांबळे, सुहानी नितीन कांबळे, सानवी संजय कदम, प्रियंका प्रदीप कांबळे, नंदिनी नितीन कांबळे, या महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना म. जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून समाज शिक्षीत करण्याकरीता केलेल्या महान कार्याचे महत्व विषद केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संबोधी महिला मंडळाकडून करण्यात आले होते.
यावेळी बोधिसत्व बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष अनंत बाळू कांबळे, मंडळाचे सचिव सुनील जयराम कांबळे, कोषाध्यक्ष राजेंद्र शिवाजी कांबळे, उपसचिव मोनीश प्रदीप कांबळे तसेच सानिका सचिन कांबळे, श्वेता सुनील कांबळे, मनीषा गोविंद कांबळे,शालिनी महेंद्र कांबळे, सरिता दत्ताराम कांबळे, सुनिता गोविंद कांबळे, प्रदीप रामचंद्र कांबळे, नितीन अनंत कांबळे, राज सचिन कांबळे, दीपेश राजेंद्र कांबळे व सुनील बाळू कांबळे आदी उपस्थित होते.