सिंधुताईंची अपूर्ण ईच्छा पुर्ण होणार !
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल.
ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय, प्रेमाची साय असलेल्या, सर्व सामान्यांची ताई असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी चार जानेवारी 2022 रोजी निधन झाले आणि महाराष्ट्रासह सर्व देश शोकसागरात डुबाला. राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, कलाकार सर्व सामान्य जनता व भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा श्रध्दांजली वाहून आपला शोक व्यक्त केला.
समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी एक खंत मात्र व्यक्त केली होती. ताईंचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात लावण्यात आलेले आहे मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी व्यक्त केली होती व ती क्लिप आता सर्वत्र वायरल होत आहे. महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठ होतं अशी शोकांतिका आपल्या राज्याची आहे असं मत या व्हिडिओमध्ये आहे. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख आहे. सोन्यासारखी माणसे या मातीमध्ये जन्माला आली त्या महाराष्ट्रात जन्मलेल्या सिंधुताई ची अखेरची इच्छा मात्र शिक्षण विभाग आता पूर्ण करावी असा सूर आज शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहेत शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पुर्ण करावी असा एक संदेश समाजात फिरत होता . ती क्लिप व सिंधुताई सपकाळ यांची खंत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी मुंबई येथील शिक्षक श्री. उदय नरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना पाठवली. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेण्याची सुचना शालेय शिक्षण विभागाला केली आहे व तसे एक पत्र शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवले आहे.
सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा व मानवतावादी दृष्टिकोन लवकरच शालेय अभ्यासक्रमात पहायला मिळेल असा आशावाद शिक्षकवर्ग व्यक्त करत आहे.