कोरोची मराठा समाजाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

कोरोची मराठा समाजाच्या वतीने पत्रकार दिन साजरा कबनूर वार्ताहर कोरोची येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त येथील समाजाच्या वतीने दत्त मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रमेश पाटील होते. स्वागत महेश कडाले यांनी केले. प्रास्ताविक संभाजी पाटील यांनी केले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन वसंत माने यांनी केले. यावेळी रमेश पाटील म्हणाले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे स्वातंत्र्य पूर्वकाळात वृत्तपत्र सुरू केले वृत्तपत्राच्या माध्यमातू निर्भिड पणे लेखन करीत म्हणून आज त्यांच्या नावे पत्रकार दिन साजरा केला जातो.पत्रकार हे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम करतात. यापुढे असेच निर्भयपणे काम करावे. यावेळी पत्रकार राजेंद्र जगदेव प्रवीण पवार, उत्तम हुजरे, सचिन बेलेकर अमित काकडे या सर्व पत्रकारांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आनंदा सूर्यवंशी, हनुमंत पाटील, महेश कडाले, वसंत माने, सचिन पवळे, विश्वास पाटील, रामदास टिकले, दत्ता देसाई यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते आभार हनुमंत पाटील यांनी मानले. फोटो ओळ कोरोची येथे पत्रकार दिनानिमीत्त सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार राजेंद्र जगदेव यांचा सत्कार करताना रमेश पाटील ,आनंदा सूर्यवंशी,वसंत माने व इतर मान्यवर