पत्रकारांची कार्य अतुलनीय आहे पी. एम.पाटील
कबनूर वार्ताहर: सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचे कार्य अतुलनीय आहे. असे प्रतिपादन पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केले.
येथील कबनूर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जेष्ठनेते जयकुमार कोले,बी.डी.पाटील, अशोक पाटील,सरपंच शोभा पोवार,उपसरपंच सुधीर पाटील,पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील,जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी केले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पी.एम.पाटील,जयकुमार कोले यांच्याहस्ते करण्यात आले.
ज्येष्ठनेते जयकुमार कोले म्हणाले, पत्रकार हे समाजजागृती करून समाजप्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. कबनूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र जगदेव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पी.एम.पाटील,जयकुमार कोले यांच्याहस्ते करण्यात आला ,तर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिवाजी चव्हाण यांचा सत्कार भूषण शशिकांत राज यांच्याहस्ते करण्यात आला.
सरपंच शोभा पोवार,उपसरपंच सुधीर पाटील, माजी सरपंच मधुकर मणेरे,बी.डी.पाटील, अशोक पाटील,प्रा.अशोक कांबळे,प्रमोद पाटील,जयकुमार काडाप्पा,मारुती आवळे, अल्ताफ मुजावर,महावीर पिंपळे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमास बबन केटकाळे,माजी सरपंच सुनील स्वामी,बाळासाहेब पाटील,ग्रामपंचायत सदस्या वैशाली कदम,स्वाती काडाप्पा,अर्चना पाटील,रजनी गुरव,सुधाराणी पाटील,सलोचना कट्टी,रोहिणी स्वामी,सुधीर लिगाडे,प्रवीण जाधव,सुनील काडाप्पा,सैफ मुजावर,तलाठी एस.डी.पाटील, ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग,बाबासाहेब कोकणे,संजय कट्टी,किशोर पाटील,शब्बीर अफ राज धूळगोंडा पाटील,महादेव पाटील,संजय चव्हाण,शिवाजी चव्हाण,अल्ताफ मुजावर,जावेद मुजावर,रियाज चिकोडे,अजित खुडे,महावीर लिगाडे,राहुल कांबळे,राहुल महालिंगपूरे,इक्बाल सनदी,भूषण राज,सुनील कांबळे,पत्रकार शिवाजी चव्हाण,विवेक स्वामी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.रवींद्र पाटील यांनी केले.आभार राजेंद्र जगदेव यांनी मानले.
फोटोओळ-
कबनूर-येथील पत्रकार दिन समारंभात मार्गदर्शन करताना पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील शेजारी सरपंच शोभा पोवार,उपसरपंच सुधीर पाटील,अशोक पाटील आदी.