कबनूरात एका महिलेला कोरोना

कबनूरात एका महिलेला कोरोना

कबनूर वार्ताहर : येथील यशोलक्ष्मी मधील एका 25 वर्षीय महिला कोरोणा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या महिला गोव्यामध्ये नोकरीला आहेत. तिथून त्या कबनूर ला आले आहेत. संबंधित महिला कोरोणा पॉझिटिव्ह असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मिळाली. आरोग्य विभागातील संबंधितानी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली.या महिलेसह घरी पाच जण राहतात. त्या सर्वांना आर टी पी सी आर् करून घेण्याची सूचना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील संबंधितांनी दिली. कुटुंबातील पाचही जनानी दोन डोस घेतले आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. कुटुंबियातील सर्वांना आर टी पी सी आर करून घेण्याची सूचना आरोग्य विभागाने दिली असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य विभागाने दिली.