लातुर येथे भट बोकड मोठा या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
लातुर : लातुर शहरातील मराठा सेवा संघाचे कार्यालय येथे मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारणीची बैठक व रुक्माई प्रकाशन अंजनडोह (बीड) ने प्रकाशित केलेल्या नवनाथ दत्तात्रय रेपे लिखत ‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले होते.
कार्यक्रामाच्या सुरुवातीला जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीत इतर मुद्यावर चर्चा करण्यात आली त्यानंतर रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड) यांनी प्रकाशित केलेले नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित ‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे प्रकाशन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. रोहन जाधव, संगितसुर्य केशवराव भोसले सा. परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश लेनेकर, विभागीय सचिव भास्कर वैराळ, जिल्हा सचिव एम.एम. जाधव, सह सचिव इंजि. तेजस मसुरकर, जिल्हा संघटक खंडेराव गंगणे, कार्यालयीन सचिव सदाशिव थोरात, उद्योजक कक्षाचे लातुर जिल्हाध्यक्ष निखिल मोटे व मराठा सेवा संघ लातुर तालुकाध्यक्ष भास्कर आदमाने यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
रुक्माई प्रकाशनाने प्रकाशित केलेले पहीले पुस्तक व नवनाथ रेपे यांनी लिहलेले दुसरे पुस्तक ‘भट बोकड मोठा’ असून यापुर्वी पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद यांचे कडून नवनाथ रेपे लिखित ‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ हे पुस्कत प्रकाशित झाले आहे असे प्रकाश लेनेकर यांनी सांगितले. यावेळी या कार्यक्रमास मराठा सेवा संघाच्या ३३ कक्षातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्यासह इतरही हितचिंतक उपस्थित होते.