**केन चेस अकादमीचा शौर्य निकुंज बगडीया प्रथम* इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शौर्य चे अभूतपूर्व यश।
सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल ,गोकुळ शिरगाव येथे 14 वर्षखालील बुद्धिबळ स्पर्धा 8 जानेवारी 2022 रोजी संपन्न झाल्या. स्पर्धेत 14 वर्ष गटात इयत्ता 1 ली ते 8 वी तील कोल्हापूर जिल्ह्यातील 90 विद्यार्थी सहभागी होते. एकूण 8 फेरी पैकी 7 गुण मिळवून शौर्य ला प्रथम क्रमांक चे गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. शौर्य इयत्ता पहिलीत संजय घोडावत स्कूल अतिग्रे येथे शिकत आहे. त्याला केन चेस अकॅडमी चे बुद्धिबळ प्रशिक्षक रोहित पोळ यांचे मार्गदर्शन मिळत आहे. शौर्य ला आई वडील, शाळेचे मुख्याध्यापक व केन ग्रुप चे प्रोत्साहन मिळत आहे. 2022 मधील पहिल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ने विजयी सुरुवात केली आहे त्यामुळे केन चेस अकॅडमी , इचलकरंजी चे बुद्धिबळ प्रशिक्षक रोहित पोळ यांनी आनंद व्यक्त केला.मागील वर्षी मिरज , सांगली, शहापूर , इचलकरंजी तसेच कर्नाटक मधील विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे. लायन्स ऑनलाइन स्पर्धेत ही बक्षिसे मिळवली आहेत व महाराष्ट्र राज्य ऑनलाइन 2021 वयोगटातील स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.कमी वयामध्ये अनेक स्पर्धेत यश संपादन करत असल्याने शौर्यचे सर्वत्र कौतुक होत आहे.