रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी
जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसच्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून निवेदन सादर करतात व त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधीत अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.
माहे जानेवारी 2022 चा महिला लोकशाही दिन सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत आयोजित केला आहे. त्या शिवाय रत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशा महिलांना सोयीच्या दृष्टीने, रत्नागिरी जिल्हयातील महिलांना प्रायोगिक तत्वार फोनव्दारे संपर्क करुन 17 जानेवारी 2022 रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर दुपारी 11.00 ते 01.00 या वेळेत त्यांचे निवेदन/अर्ज नोंदविता येतील.