रत्नागिरी : खेड तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष पदी इक्बाल जमादार

रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी

खेड तालुक्यातील संगलट गावचे सुपुत्र इक्बाल जमादार यांची खेड तालुका पत्रकार संघ कडून उपाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आली इक्बाल जमादार त्याने गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये आपला उल्लेखनीय कार्य करत असताना अनेक विषयाला वाचा फोडली आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला पत्रकार इक्बाल जमादार यांनी विशेष कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच तालुका दक्षता समिती संगलट गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष अशा अनेक पदावर पूर्वी काम केले आहेत इक्बाल जमादार यांनी सर्वसामान्याला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कार राज्यस्तरीय देखील मिळाले आहेत यांची दखल घेऊन पत्रकार दिनानिमित्त खेडचे नगराध्यक्ष वैभव जी खेडेकर यांच्या हस्ते सुद्धा भव्य सत्कार करण्यात आला आणि अनेक मान्यवरांनी इक्बाल जमादार यांना खेड तालुका पत्रकार संघ उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.