साडे पाच लाखाची लाच घेणाऱ्या प्रांताधिकारी व सरपंचाला दोन दिवसाची पोलीस कोठडी

साडे पाच लाखाची लाच घेणाऱ्या प्रांताधिकारी व सरपंचाला दोन दिवसाची पोलीस कोठडी

कोल्हापूर,दि.१० (प्रतिनिधी) क्रशर व्यवसाय चालू ठेवण्यासाठी दिलेली नोटीस परत घेण्यासाठी सरपंचा मार्फत साडे पाच लाखाची लाच स्वीकारताना राधानगरीचा प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान याच्यासह फराळेचा सरपंच संदीप डवर याला अँटी करप्शननने रविवारी ताब्यात घेतल होते. आज त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
क्रशर व्यवसाय नियमित सुरू ठेवण्या संदर्भात दिलेली नोटीस परत घेण्यासाठी राधानगरीचा प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान याने 10 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. रविवारी प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान याच्यासाठी लाचेचा पहिला हप्ता म्हणून साडे पाच लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी फराळे गावचा सरपंच संदीप डवर आणि प्रांताधिकारी या दोघांना अँटिकरप्शन विभागाने रविवारी ताब्यात घेतल होते. महसूल विभागातील प्रथम श्रेणी दर्जाच्या अधिकाऱ्याला लाचप्रकरनी ताब्यात घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. आज प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान आणि फराळे गावचा सरपंच संदीप डवर या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.