रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार
इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे, भुपाल चौगुले, महावीर चिंचणे यांचा सत्कार करण्यात आला.
रोटरी भवन येथे संपन्न कार्यक्रमात इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे यांचा सत्कार गजानन सुलतानपुरे, दै. सुतबाजारचे संपादक भूपाल चौगुले यांचा सत्कार प्रकाश दत्तवाडे व सुर्यकांत बिडकर आणि महावीर चिंचणे यांचा सत्कार आप्पासो कुडचे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी, इचलकरंजी व इचलकरंजीतील पत्रकारीता याविषयी अभ्यासपूर्ण माहिती विषद केली. त्यांनी इचलकरंजीचा जुना इतिहास, राणी बागेचे नांव व राजाराम स्टेडीयमचे नांव कसे पडले याचा स्मरणीय उल्लेख केला. त्याचबरोबर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत झालेल्या वार्तालापाचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
याप्रसंगी प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी इचलकरंजीच्या पत्रकारीताबाबत मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत प्रोबस क्लबचे सेक्रेटरी शिवबसु खोत यांनी तर प्रास्ताविक प्रोबस क्लबचे अध्यक्ष विलास पाडळे यांनी केले. सौ. सुजाता कोईक व विजय पोवार यांनी 75 कोटी सूर्यनमस्कार प्रोजेक्ट राबविणेसाठी सहभागी होण्यासंदर्भात माहिती देत यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी जानेवारी 2022 मधील क्लब सदस्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. शेवटी प्रोबस क्लबचे उपाध्यक्ष गजानन शिरगुरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास प्रोबस क्लबचे एम. के. कांबळे, मोहनराव भिडे, बाळासो देवनाळ, विजय हावळे, महावीर कुरुंदवाडे, मनोहर कुराडे, रामचंद्र निमणकर, प्रकाश सुलतानपुरे, प्रकाश जगताप, धनपाल बिंदगे, राजू भुमकर, सुनिल कोष्टी, डॉ. प्रकाश पाटील, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. प्रमोदिनी देशमाने, सौ. वर्षा कुलकर्णी, मिरा जोशी, शबनम नाईकवडे, सौ. शैलजा सवदीमठ, सौ. कोष्टी, सौ. शारदा कवठे, सौ. सुजाता कोष्टी, आर. आर. जोशी आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर