Anti corruption bureau Ratnagiri | खेडमध्ये 14 हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Anti corruption bureau Ratnagiri | खेडमध्ये 14 हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

खेड : सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी चौदा हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. बुधवार दि. १२ रोजी हा सापळा रचण्यात आला होता. भरणे मंडल अधिकारी सचिन यशवंत गोवळकर (वय – ४३, रा. भरणे , ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भरणे ग्रामपंचायत कार्यालयात त्याला अटक केली आहे.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12 वर नावाची नोंद घालून ती मंजूर करून देण्यासाठी सचिन गोवळकर याने एका इसमाकडे १4 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. याबाबत या इसमाने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, ठाणे विभागाचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलिस उप-अधीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस हवालदार श्री नलावडे, पोलिस नाईक श्री हुंबरे, श्री. आंबेकर, श्री पवार, चालक श्री. कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.