रत्नागिरी | जनशताब्दी एक्स्प्रेस इंजिनात बिघाड झाल्याने खोळंबली
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस या गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने चिपळूण येथे खोळंबली होती . मात्र अर्ध्या तासात बिघाड दुरुस्त झाल्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली.
चिपळूण येथे जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने गाडीला बिलंब झाला. दादर- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेनुसार चालली होती. मात्र, चिपळूण नजिकच्या कापसाळ दरम्यानच्या बोगद्याजवळ गाडीच्या इंजिनात बिघात झाला. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अथळा निर्माण झाला. दुसरे इंजिन येईपर्यंत गाडीला बिलंब झाला होता. दुरुस्तीनंतर गाडी अर्ध्या तासात मार्गस्थ झाली.