गुडाळ /प्रतिनिधी संभाजी कांबळे
सावित्रीबाई माध्यमिक विद्यालय कसबा तारळे या शाळेने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती मध्ये उत्तुंग भरारी व उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये कुमारी वसुधा प्रकाश मोहिते (250) राज्यात 19 वे स्थान प्राप्त केले व तसेच जिल्ह्या यादीमध्ये कुमारी, ऋचा विठ्ठल पाटील (244) तर कुमारी श्रद्धा विठ्ठल पाटील( 210) गुण मिळवून यश प्राप्त केले आहे
या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले त्यांना एटी जाधव सर ,पीजी हुजरे सर ,एस एस आरडे , मुख्याध्यापक वा ग रे सर ,मा मुख्याध्यापक भोसले मॅडम यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले व तसेच स्वर्गीय या संस्थेचे संस्थापक चेअरमन विश्वासराव देशमुख साहेब, या संस्थेचे सचिव आय सी कांबळे सर, भोगावती सहकारी साखर कारखाना संचालक ,जयवंतराव कांबळे, आर पी आय ,जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे (कुरुकली कर) व इतर सर्व सदस्य पदाधिकारी सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुज्ञ पालक यांची प्रेरणा मिळाली..