रत्नागिरी : लांजा तालुक्या अंतर्गत झापडे-कांटे येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाची शाखा जाहीर करण्यात आली. रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव, उपाध्यक्ष काका जोशी महासचिव प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडीचे लांजा तालुका उपाध्यक्ष जे बी कांबळे, मोहन कांबळे, महासचिव प्रभाकर कांबळे, संपर्क प्रमुख जगन्नाथ कांबळे, प्रवक्ते नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झापडे/कांटे येथील शाखा जाहीर करण्यात आली. तसेच नूतन शाखेचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद वाकेड गट व पंचायत समिती साटवली गणामधील पदाधिकारी जाहीर करत पक्षाच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी झापडे कांटे नूतन शाखेचे अध्यक्ष प्रमोद शंकर पवार , उपाध्यक्ष गोपाळ गुणाजी सावंत, सचिव सूरज विलास पवार, सहसचिव सतीश रमेश सावंत, संघटक अशोक सखाराम पवार तसेच जिल्हा परिषद वाकेड गट उपाध्यक्ष मिलिंद नारायण सावंत, संघटक गौतम सोमा सावंत, पंचायत समिती साटवली गण अध्यक्ष शंकर रामचंद्र पवार, सचिव राजेंद्र गंगाराम सावंत आदींची निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.