स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त येथील सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व्याख्यान माला ; लोकहिरा” साप्ताहिकाचे प्रकाशन

कुरुंदवाड दि.11(प्रतिनिधी):— स्वातंत्र्याच्या (75 वर्षे) अमृत महोत्सव निमित्त येथील सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 14 ते रविवार दिनांक 16 जानेवारी 2022 अखेर दररोज सायंकाळी 6 वाजता नामांकित विचारवंतांचे व्याख्यान व संपादक गणपती शिंदे यांच्या “लोकहिरा” साप्ताहिकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केल्याचे सत्यशोधक चळवळीचे अध्यक्ष अॅड.ममतेश आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
कुरुंदवाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील कुमार विद्यामंदिर नंबर 1 या शाळेमध्ये दररोज सायंकाळी 6 वाजता व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. 14 जानेवारी 2022 रोजी सौ. मनीषा उदय डांगे(मॅडम) माजी नगराध्यक्षा कु.न.पा. यांचे “आजादी कि राहपर” या विषयावर व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी भांगे कुरुंदवाड पोलीस ठाणे हे असणार आहेत. शनिवार दि. 15 रोजी बाबासाहेब नदाफ( महामंत्री राष्ट्रसेवा दल) यांचे सिंधुताई संकपाळ अनाथांची माऊली या विषयावर व्याख्यान असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास मदाळे सामाजिक कार्यकर्ते हे असणार आहेत. तर रविवार दिनांक 16 रोजी धनंजय धोत्रे सर यांचे “पूरग्रस्तांच्या समस्या आणि शासनाची भूमिका” या विषयावर व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय डांगे नगरसेवक कु.न.पा.हे असणार आहेत. हे सर्व कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून होणार असल्याचे अॅड. आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अॅड.ममतेश आवळे, संस्थापक अध्यक्ष शशिकांत पाटील सर, समन्वयक जे.पी. जाधव सर, तर संयोजक गणपती शिंदे उपाध्यक्ष, बाळासाहेब गायकवाड सचिव, उत्तम बिरंगे खजिनदार, चंद्रकांत मोरे सर, संजय पाटील सर, आप्पासाहेब बंडगर आदी आहेत.