रत्नागिरी : जिल्ह्याला ऑक्सिजनचा अजिबाबत तुटवडा भासणार नाही. सद्यस्थितीत 16 हजार के. एल. क्षमतेचा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. पैसे न दिल्याने ऑक्सिजन पुरवठा होत नाही, ही माहिती चुकीची पसरवली गेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
या बाबत डॉ. फुले म्हणाल्या की, मुळात ऑक्सिजन पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. 44 लाख रूपयांच्या बिलांपैकी 25 लाख दिले गेले आहेत. अद्याप 15 लाख देणे आहे. मात्र, यामुळे ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आलेला नाही. तब्बल 16 हजार के. एल. क्षमतेचे ऑक्सिजन आता उपलब्ध आहेत.
Posted inरत्नागिरी