मुंबई : केंद्र सरकारच्या सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालायाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. या ट्विटर अकाऊंटचे नाव आणि प्रोफाईल फोटोही बदलण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर बुधवारी सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली. मात्र, आता खाते पूर्ववत करण्यात आले आहे.
दरम्यान, हॅकर्सने नाव आणि फोटो बदलला आहे. हॅकर्सने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटचा फोटो आणि नाव बदलले होते. हॅकर्सनी प्रोफाईलवर एलोन मस्क या नावासह माशाचा प्रोफाइल फोटो अपलोड केला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की, आज सकाळी मंत्रालयाच्या खात्यात छेडछाड झाली होती, ती दुरुस्त करण्यात आली आहे. मंत्रालयाने ट्विट केले की, ‘ट्विटर अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले आहे.’