शिष्यवृत्ती परीक्षेत तन्वी विद्याधर कांबळे जिल्ह्यात नववी ; ‘नंदाई प्रतिष्ठान’कडून विशेष सत्कार

रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये रत्नागिरी येथील पटवर्धन विद्यालयातील इयत्ता आठवीतील तन्वी विद्याधर कांबळे हिने रत्नागिरी जिल्ह्यात नवव्या क्रमांकाने व विद्यालयात पहील्या क्रमांकाने घवघवीत यश संपादन करून रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे.

महाराष्ट्र् राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तन्वी विद्याधर कांबळे हिने 81.88 टक्के गुण प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असून सर्वांसाठी हि अभिमानाची गोष्ट आहे. ती 2021 चा आदर्श पुरस्कार मिळवणाऱ्या विद्याधर कांबळे यांची मुलगी आहे.

तिच्या या यशस्वी कामगिरीबद्दल कौतुक करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी नंदाई प्रतिष्ठानच्या वतीने तन्वी कांबळे व तिच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. व पुढील शैक्षणिक वाटचालीस सुभेच्छा हि दिल्या.

यावेळी नंदाई प्रतिष्ठाणचे पदाधिकारी सुनील कांबळे, राजेंद्र कांबळे, महेंद्र कांबळे, राजन कांबळे, रोहित कांबळे, रोहन कांबळे, तेजस कांबळे आदी उपस्थित होते.