सलमान खान शेजाऱ्यांविरोधात कोर्टात, मुलाखतीत बदनामी केल्याचा आरोप

सलमान खान शेजाऱ्यांविरोधात कोर्टात, मुलाखतीत बदनामी केल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अनेक वेळा सण तसेच विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये कुटुंबासोबत जात असतो. या फार्महाऊसमधील फोटो सलमान सोशल मीडियावर शेअर करतो. लॉकडाऊनमध्ये देखील सलमान त्याच्या या पनवेल येथील घरामध्ये राहात होता. पनवेलमधल्या सलमानच्या फार्म हाऊसजवळच्या भूखंडाचे मालक असलेल्या केतन कक्कर विरूद्ध सलमानने सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला आहे.

सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कड विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. त्याने म्हटले आहे की, सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे. केतन कक्कड यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला रिप्लाय फाईल करण्यासाठी वेळ मागितला आहे. केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी २१ जानेवारीला होणार आहे.