इचलकरंजी/प्रतिनिधी –
शासनाच्या दलित वस्ती योजना अंतर्गत इचलकरंजी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 17 मध्ये 125 इलेक्ट्रीक पोल आणि 10 हायमास्ट खांब उभारण्यात आले आहेत. या कामाचा शुभारंभ कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. भागातील लोकप्रतिनिधी माजी आरोग्य सभापती संजय केंगार यांनी केलेल्या पाठपुराव्यातून हे काम पूर्ण झाले आहे.
प्रभाग 17 मधील सहकारनगर, साईट नं. 102 व नवीन वसाहत, 300 खोल्या, आसरानगर, मळेभाग, आयकर कॉलनी, गुलमोहर कॉलनी, सुरभि कॉलनी, वृंदावन कॉलनी, सिध्दीविनायक कॉलनी व कचरा डेपो परिसरात 7 व 9 मीटरचे 125 इलेक्ट्रीक पोल आणि 10 हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. प्रदीर्घकाळापासून असलेली मागणी माजी नगरसेवक संजय केंगार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाल्याने भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मकर संक्राती दिनी या सर्वच पोलचा शुभारंभ युवा नेते स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. सुनिता शेळके, कॉ. दत्ता माने, संतोष शेळके, शंकर कांबळे, दत्ता कदम, मिट्टू सुर्यवंशी, जितेंद्र मस्कर, कुमार एकशिंगे, जीवन कोळी, अल्लाउद्दीन पडसलगी, मौला पटेल, मारुती पाथरवट, भिमराव पाथरवट, पप्पू दास, विष्णू देडेे, तुळशीदास चव्हाण, चंद्रकांत चौगुले, महादेव आदमापुरे, सुभाष मलाबादे, बापूसो घुले, संजय पुजारी, राजू कोरे, दिगंबर कुलकर्णी, दिलीप ढावरे, प्रशांत शिवशरण, सचिन तोरडमल, निहाल नवले, शिवाजी कांबळे, दत्ता हेगडे, संदीप बंडगे, निरज माछरे, सिध्देश्वर माळकुटे, राजू होगाडे, राजू तराळ, बच्चन आसुलकर, शकिल मुरसळगी, आप्पा देडे, राहुल आवळे, राजू मंडल आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर