कोल्हापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटीलयांचं निधनं झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे.
एनडी पाटील गेले आठ वर्ष डॉ.अशोक भूपाळी यांच्याकडे उपचार घेत होते. त्यांची एक किडनी काढली होती. तसेच 11 जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अॅडमिट केलं गेलं होत, अशी माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली होती. ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे कोणताही मोठी उपचार केले नाहीत, असं डॉ. भूपाळी म्हणाले होते. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाला होता, असं डॉ. अशोक भूपाळी म्हणाले होते.