काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे आवाहन
बुलडाणा : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेले डिजिटल सदस्य नोंदणी अभियान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी करावयाचे आहे. राज्य पातळीवर जिल्ह्यातून सर्वाधिक सदस्य नोंदणी व्हावी. असा आपला प्रयत्न असून, यासाठी डिजिटल सदस्यता नोंदणी अभियान हे जनआंदोलन बनवा, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
डिजीटल सदस्यता नोंदणी अभियानासंदर्भात जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांनी १४ जानेवारी २०२२ रोजी सर्व ब्लॉक अध्यक्ष, पक्षनेते , निरीक्षक यांची झूम मिटींग घेऊन या अभियानाबद्दल माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना राहुल बोंद्रे पुढे म्हणाले की, या अभियानासाठी प्रत्येक बूथवर चार स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाईल यासाठी तीन पुरुष व एक महिला स्वयंसेवकांचे नाव निश्चित करावयाचे आहे. या स्वयंसेवकांना महसूल विभाग मुख्यालयी तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. डीजिटल सदस्य नोंदणी अभियान हे पारदर्शक व विश्वासार्ह आहे. सदस्य नोंदणीनंतर त्यांना ओळखपत्रही दिले जाणार आहे. जिल्ह्याने नेहमीच राज्य पातळीवरील सर्व कार्यक्रमात मोठे योगदान दिलेले आहे, आताही या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून मोठे योगदान द्यावे, असेही ते म्हणाले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, निरिक्षक, पक्षनेते यांनी विविध प्रश्न उपस्थित करून शंकाचे निराकारण केले.या बैठकीस आ. राजेश एकडे, पक्षनेते स्वाती वाकेकर, अॅड अनंतराव वानखडे, तसेच निरीक्षक गणेश पाटील, रमेश कायंदे, सुनिल सपकाळ, शिरीष डोरले, संजय ढगे, तेजराव मारोडे, कैलास देशमुख, अच्छे खा हबीब खा, दिपक खरात, वसंतराव देशमुख, तसेच ब्लॉक अध्यक्ष राजेश मापारी, समाधान सुपेकर, देवानंद पवार, सिद्धार्थ जाधव, डॉ सदानंद धनोकार, किरण देशमुख, भगवान धांडे, राजू पाटील, बंडू चौधरी आदी उपस्थित होते