रत्नागिरी काँग्रेसचे पक्षनेते अनिरुद्ध कांबळे ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी काँग्रेस पक्षनेते अनिरुद्ध कांबळे यांना रविवार, दि. १७ जानेवारी रोजी इचलकरंजीतील प्रसिद्ध वृत्तपत्र महालक्ष्मी टाइम्स परिवाराकडून ‘कोरोना योद्धा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

संगमेश्वरमधील कांबळे टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ‘कोविड’ काळात काँग्रेसचे नेते अनिरुद्ध कांबळे यांनी समाजाभिमुख काम करत अनेक गरजूंना मदतीचा हात दिला. अन्नधान्य, आर्थिक मदत त्यांनी कोरोना महामारीच्या काळात केली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आयोजित करण्यात आला होता. आमदार शेखर निकम, निवृत्त वायुसेना अधिकारी पुणे आर बी पाटील, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक सामाजिक कार्यकर्ते युसूफ आर्ते, महालक्ष्मी टाइम्स चे संपादक फिरोज शेख, कॅप्टन हनिफ खलपे, मजीद नेवरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थित हा पूरस्कार देण्यात आला.