बुलढाणा : नांदुरा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला असून त्या बँकेची जोपर्यंत निवडणुक होत नाही तोपर्यंत त्या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी.तसेच नांदुरा येथील शिक्षक सहकारी पतसंस्था या संस्थेची सुध्दा संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला असून त्या शिक्षक पतसंस्थेवर सुध्दा निवडणुक होईपर्यंत प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी. वरील दोन्ही संस्थेवर प्रशासकीय नेमणूक दि. २४/०१/२०२२ पर्यंत करण्यात यावी. अन्यथा दि.२५/०१/२०२२ पासून तहसिल कार्यालय नांदुरा येथे बेमुदत आमरण उपोषण पुकारण्यात येईल व त्या उपोषणादरम्या उद्भवणाऱ्या संपूर्ण परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. या आशयाचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे यांनी सहकार आयुक्त कार्यालय पुणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, बुलडाणा. यांना दिनांक १२/०१/२०२२ रोजी दिले.
Posted inबुलढाणा