मलकापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द काढून त्यांना मारण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील भारतीय जनता पक्षाच्यावतीन करण्यात आली. याबाबतचे निवेदन येथील ठाणेदारांना देण्यात आले. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात मोहन शर्मा, संजय काजळे, मिलिंद डवले, शंकर पाटील, डॉ. योगेश पटनी, संतोष बोंबटकार, आनंदा शिरसाठ, श्याम वानखेडे, कुणाल सावळे, नाना येशी, भगवान चोपडे, अॅड. डी. एस. तायडे, रवी वानखेडे, दुर्गेश राजापुरे, सागर बेलोकार, अमेय तोडकर, सुभाष चव्हाण, अजय नांदुरकर, देवान टाक, कृष्णा ढोलकर, साहेबराव खराडे, आशिष चुनाडे, रामा मेहेसरे, विशाल मधवानी चंद्रकांत वर्मा, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
Posted inबुलढाणा