दोन दुचाकींची कुरधुंडा येथे समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कुरधुंडा येथील एका अवघड वळणावर दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत.
संतोष बाळासाहेब फराकटे आणि संदेश हरिचंद्र चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला.

याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कोळंबे येथून संगमेश्वरकडे जाणारी हिरो होंडा शाईन ( एम एच ०८ बी एफ ३२३९) व संगमेश्वर बावनदीकडे जाणारी हिरो होंडा पॅशन प्रो ( एम एच ०८ए ई५३९४) या दोन्ही गाड्यांमध्ये समोरासमोर अपघात झाला. जखमींना अधिक औषधोपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत