कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दिलेल्या जमिनीचे कर्जे माफ करावीत शेतकऱ्यांची मागणी

कुरुदवाड – प्रतिनिधी
-कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दिलेल्या जमिनीच्या कर्जाबाबत महापुर अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटामध्ये दलित शेतकरी सापडलेला आहे या संकटातून उत्पन्न काहीच मिळाले नाही त्यामुळे आम्हा लाभार्थ्यांना कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्जमाफी च्या परिपत्रकानुसार शिरोळ तालुक्यातील 39 लाभार्थ्यांना कर्ज माफी मध्ये पात्र करून त्यांना या संकटातून मुक्त करावी अशा आशयाचे निवेदन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना तालुक्यातील 39 लाभार्थ्यांनी दिले आहे दरम्यान आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी तात्काळ सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे यांना पत्र देऊन सर्व बाबींचा विचार करता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेअंतर्गत दिलेल्या जमिनीच्या कर्जाची संपूर्ण कर्जमाफी देणे बाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशा विनंती सामाजिक न्याय मंत्री नामदार मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे
महाराष्ट्र . राज्यातील दारिद्रय रेषेखालील अनुसुचित व जाती नवबोध्द घटकातील भुमि हिन शेतमजुर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा याकरिता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागातर्फे 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज या स्वरूपात निधी उपलब्ध करून भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना जमीन वाटप करून दिली आहेत तथापि गेले दहा वर्षाचा आढावा घेतला असता नैसर्गिक आपत्तीने नवीन शेतकरी ग्रासला आहे कारण शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही दिवसेंदिवस खताचे दर औषधे विजेचा दर खाजगी व सहकारी पाणीपट्टी दर वाढतच आहेत उत्पादन खर्च व सोसायटी हात उसणे घेतलेल्या कर्जाचा डोंगर कमी होत नाही शेतकरी किती कष्ट घेतो मात्र त्यांच्या हाती काहीच लागत नाही पण प्रत्येक वर्षी कर्ज वाढत असल्याने शेतकरी वैतागले असून पारंपरिक प्रस्थापित शेतकरी नसून गेल्या दहा वर्षांपासून सदर योजनेतील शेती घेऊन शेती करीत असल्यामुळे शेतीमालाला मिळत असलेली कवडीमोल रक्कम नैसर्गिक संकट त्यामुळे तमाम शेतकरी कर्जाच्या खाईत अडकलेला आहे त्यामुळे कर्जाचे हफ्ते परतफेड करू शकत नाही शेतमजूर कुटुंबांना सामाजिक न्याय खात्याकडून जमीन मिळालेली आहे त्या शेत जमिनीतून मुलांचे शिक्षण आरोग्य आणि जीवन जगणे मुश्कील होऊन बसले आहे त्यामुळे मरता येत नाही म्हणून जगण्याची पाळी आली आहे या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी सामाजिक न्यायमंत्री राज्य शासनाची आहे जमीन वितरित केल्या पासून आज अखेर जमिनीत कोणते पीक घेण्याचा प्रयत्न केल्यास महापूर अतिवृष्टी आणि इतर शेतकरी सापडलेला आहे या संकटातून उत्पन्न काहीच मिळाले नाही त्यामुळे आम्हास लाभार्थ्यांना कर्ज भरणे कठीण झाले केंद्र राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या परिपत्रकानुसार कर्जमाफी मध्ये पात्र करून त्याला या संकटातून मुक्त करावे आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी विनंती अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे त्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा जागर करावा ही विनंती असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आली आहे या निवेदनावर दर्शन ठोमके पुंडलिक ठोमके सुरेश सावंत सुरेश कांबळे विनोद आवळे दिपाली आवळे भीमराव मधाळे जनाबाई आवळे मोहन हरिबा गायकवाड दिलीप गायकवाड आधी 39 लाभधारकांच्या सह्या या निवेदनावर आहेत