महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना फेडरेशन Aituc.
१९ जाने.रोजी सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचां महत्त्वपूर्ण मेळावा झाला. या मेळावाच्या सुरुवातीस आदरणीय कष्टकरी जनतेचे नेते प्राध्यापक एन डी पाटील यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने यावर्षी कॅलेंडर चे उद्घाटन कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. बांधकाम कामगारांच्या सर्व महत्त्वाच्या योजना संबंधी या कॅलेंडरमध्ये माहिती देण्यात आलेली आहे.
मेळावा मध्ये बोलताना शंकर पुजारी यांनी सांगितले की,सध्या महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी 13 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. परंतु या योजनांची अंमलबजावणी कार्यक्षमपणे होत नसल्यामुळे दरवर्षी व्याजा इतकी रक्कम सुद्धा कामगारांच्या कल्याणासाठी शासनाकडुन खर्च होत नाही. बांधकाम कामगारांच्या घरांची योजना राबविण्यामध्ये शासनाकडून अत्यंत दुर्लक्ष करण्यात येत आहे. म्हणूनच ही योजना राबवण्यासाठी यापुढील काळामध्ये कामगारांनी जोरदार आंदोलन करावे असे त्यांनी आवाहन केले.
कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या घरबांधणीसाठी दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे ती वाढवून मिळावी अशीही मागणी मेळाव्यामध्ये करण्यात आली.
या वर्षी बांधकाम कामगारांच्या घरांचे आंदोलन घर मिळवून घेण्यासाठी तीव्र करण्यात येणार आहे. यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयामध्ये निर्णय होऊन सांगलीतील बेघरांना घरे मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचबरोबर ग्रामीण व शहरी भागांमध्ये सुद्धा घरांचे अर्ज भरून घेण्याचे काम निवारा भवन कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेले आहे.
या महत्त्वपूर्ण मेळाव्यामध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यां सरचिटणीस प्राध्यापिका शरयू विशाल बडवे, युनियनचे सचिव कॉ विशाल अशोक बडवे, सोनाली कुदळे, अश्विनी कांबळे, वैभव बडवे, संभाजी लोहार सुरेश सुतार इत्यादीने महत्त्वपूर्ण भागीदारी केली
Posted inसांगली