महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिलसदस्यपदी नितीन धूत यांची निवड
इचलकरंजी/प्रतिनिधी -महाराष्ट्रातील सर्व उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व संघटनाची शिखर संस्था असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, मुंबई या शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या स्वीकृत सदस्यपदी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे व्हाईस प्रेसिडेंट नितीन धूत यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही निवड जाहीर केली.महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून व्यापार, उद्योग, सेवा क्षेत्रात भेडसावणार्या समस्यांचे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निराकरण करुन सर्व क्षेत्रातील संस्था व संघटनांना उभारी देण्याचे कार्य अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. उद्योगपती नितीन धूत हे अनेक वर्षांपासून इचलकरंजी व परिसरातील विविध व्यापारी व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सक्रीय सहभाग घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहेत. क्रेडाई इचलकरंजी चे ते संस्थापक अध्यक्ष असून बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी चे व्हाईस प्रेसिडेंट त्याचबरोबर ग्लोबल मारवाडी चॅरिटेबल फौंडेशनचे चे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. उद्योग क्षेत्राबरोबरच नितीन धूत हे सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. श्री. धूत यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, मुंबई या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या स्विकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे.