अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज बहुप्रतीक्षित अमेझॉन ओरिजनल मूव्ही गेहराईयांचा ट्रेलर प्रदर्शित केला. गुणवत्तापूर्ण शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केलेला गेहराइंया हा सिनेमा नात्यांमधील नाट्यावर आधारित असून त्यात गुंतागुंतीची आधुनिक नाती, प्रौढ होणं, काही गोष्टी सोडून देणं आणि आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात घेणं असं बरंच काही पाहायला मिळणार आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अन्यया पांडे यांच्या प्रमुख भूमिका असून त्याचबरोबर धैर्य कारवा, नसिरूद्दीन शहा आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वायकॉम 18, धर्मा प्रॉडक्शन्स आणि शकुन बत्रा यांच्या जॉस्का फिल्म्सची संयुक्त निर्मिती असलेल्या या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर केवळ अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 11 फेब्रुवारी, 2020 रोजी जगभरातील 240 देशांत होणार आहे.
या सिनेमाविषयी दीपिका पदुकोण म्हणाली, ‘गेहराइंयामधली माझी व्यक्तीरेखा- अलिशा मला खूप जवळची आहे आणि निश्चितपणे मी आतापर्यंत साकारलेल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आहे. एकाचवेळेस मजेदार आणि तितकीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रत्येक भूमिकेचा संघर्ष, मार्ग, सच्चा, नैसर्गिक आणि आपलासा वाटणारा आहे. प्रेक्षकांना आपलासा वाटेल असा प्रवास घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नातेसंबंध आणि मानवी नात्यांबद्दल भाष्य करण्यात शकुन कुशल आहे. गेहराइंयामध्ये त्यानं सर्वांना आपलीशी वाटेल अशी गोष्ट गुंफली आहे आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट जगभरात सर्वांपर्यंत पोहोचणार असल्याचा मला खूप आनंद वाटत आहे.’
‘एकप्रकारे मला घरी पर आल्यासारखं वाटतंय,’ सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला. ‘अभिनेता म्हणून माझा प्रवास अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरून सुरू झाला आणि गेहराइंयासारखा माझ्यासाठी अभिमानास्पद असलेल्या सिनेमाचं वर्ल्ड प्रीमियर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होत आहे. माझ्या मते, आपल्या सर्वांचं व्यक्तिमत्त्व थोडंफार झायनसारखंच असतं. त्याच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, स्वप्नांप्रती ध्यास आणि अवघड पर्याय समोर आल्यानंतर होणारा संघर्ष सर्वांनाच आपलासा वाटणारा आहे. आपल्या प्रत्येकासाठीच गेहराईयां हा हृदय आणि आत्म्यासाठीचा सिनेमा आहे. या सिनेमाचा प्रीमियमर जागतिक प्रेक्षकांसाठी 240 देशांत होत असल्यानं मी थरारून गेलो आहे. ’