मुंबई : ‘व्हाय आय किल गांधी’ या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथूरामची भूमिका केली आहे. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारा असल्याने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करतो. असे महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले कि ज्यांच्या साठी नथुराम आदर्श आहे त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळायलाच हवे. आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याने त्यावर चर्चा व्हावी असे मला वाटत नाही.
ज्यांना जे आदर्श वाटत असतील त्यांनी त्यांची आवश्य स्तुती करावी. त्याला कुणी विरोध करू नये. शेवटी प्रत्येकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करायला हवा. मात्र अमोल कोल्हे हे एका राजकीय पक्षाचे नेते असल्याने टीका होऊ शकते पण त्याच बरोबर ते एक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांनी कोणती भूमिका करावी याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे अशी प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी व्यक्त केली आहे.