राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु होणार, बालवाडी ते बारावीचे वर्ग भरणार; सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यात कोराना रुग्ण संख्या नियंत्रणात आल्यामुळे 15 फेब्रुवारीपयर्र्ंत बंद करण्यात आलेल्या शाळा आता सोमवार, 24 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा गजबजणार आहेत. कोरोनाची स्थिती पाहून बालवाडीसह बारावीपयर्र्ंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्याची घोषणा आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. मात्र पालकांच्या संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी अशा ठिकाणी पूर्णपणे कोरोना नियमांचे पालन करुन आम्ही ज्या मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करुन या शाळा सुरु केल्या जातील. सातत्याने शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा त्या ठिकाणचे पालक असतील, विविध संघटनांच्या माध्यमातून शाळा सुरु करण्याची मागणी होत होती. त्याचा उल्लेख मी काल केला होता. आम्ही मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. सगळ्यांचे एकच म्हणणे होते की, शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात यावेत. तशाच तर्‍हेने काल फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती आणि शाळा सोमवार, 24 जानेवारीपासून सुरु कराव्यात अशी विनंती केली होती. ती विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे पालक वर्ग, स्कुल मॅनेजमेेंट कमिटी, शिक्षक, मुख्याध्यापक, तेथील स्थानिक प्रशासन, शिक्षणाधिकारी, कलेक्टर, आयुक्त यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शाळा सुरु करण्याबाबतचे निर्णय घेतले जातील.

ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे कोरोनाचे नियम पाळून, आम्ही दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन या शाळा सुरु केल्या जातील. याबाबतचे सगळे निर्णय आम्ही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे 24 तारखेपासून पहिली ते बारावी आणि बालवाडीचे वर्ग सुरु होतील, असे गायकवाड यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, या शाळा सुरु करताना सातत्याने आपण कोरोनाशी सामना करत आहोत. त्यात आम्ही विद्याथ्यार्र्ंच्या आरोग्याची नेहमीच काळजी घेतली यापुढेही ती घेणार आहोत. मुलांचे आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे स्थानिक स्थितीकडे लक्ष ठेवत वारंवार आढावा घेतला गेला पाहिजे. अधिकार्‍यांच्या माध्यमातून परिस्थितीचा पूर्णपणे आढावा घेऊन त्यावर भविष्यातील पुढील निर्णय घेण्यात यावेत. त्यामुळे पूर्ण काळजी घेऊनच या शाळा सुरु करण्यात याव्यात असे आवाहन करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच पालक संमती देतात ते विद्यार्थी शाळेत प्रवेश करतील. परंतु शिक्षण कुणाचेही थांबू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत ते भविष्यातही सुरु राहतील. त्यामुळे कुणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे निर्णय घेतले जातील, असेही त्या म्हणाल्या.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात आम्ही येणार्‍या काळात निर्णय घेणार आहोत. निवासी शाळा किंवा वसतीगृहात गेल्या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. त्यामुळे निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या काळात आम्ही निर्णय घेणार आहोत. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देणे हा सर्वात महत्वाचा विषय आहे. त्यात शाळेतच जाऊन मुलांचे लसीकरण करता येईल का? हे आम्ही पाहत आहोत. शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत त्यांनी दोन्ही लस घेणे बंधनकारक आहे. आयुक्त, कलेक्टरांना सांगू इच्छितो की, ज्या शिक्षकांचा एक डोस घेणे बाकी असेल तर त्या संदर्भातील कारवाई लवकर पूर्ण करावी.