“मतदान कोणत्याही पक्षाला करा” पण…मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करा: नरेंद्र नवनित इंगळे

मलकापूर प्रतिनिधी/ करण झनके

तुम्ही मतदार आहात का? तुम्ही १८ वर्षाचे झाला आहात का..? तुम्हाला माहित असेल किंवा नसेल पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे “तुमच्या मताची किमंत मीठ-मिरची इतकी समजु नका त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा मत विकत घेऊ पाहणार्या इतके कंगाल कोणीच नसेल” या विचारांना ध्यानात घेऊन ज्यांचे नाव मतदान यादीमध्ये नाही आहे ज्या तरुण-तरुणीचे वय १८ वर्ष पुर्ण झाले आहेत.
त्यानी आपल्या मतांची किंमत ओळखावी व जागरुक नागरिक बनुन मतदान कोणत्याही पक्षाला करावे पण आपले नाव मतदान यादित नोंद करावे कारण आज आपल्या देशाला प्रगतशिल बनवण्याचे काम आपल्या देशात आपल्या मतामुळे निवडुन येणारे प्रतिनिधी करतात तरी वय १८ वर्षे पुर्ण झालेल्या व मतदान यादी मध्ये नाव नसलेल्या सर्व नागरिकांनी आपले नाव मतदान यादी मध्ये आजच नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहान ग्रामीण युवा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र नवनित इंगळे यांनी मतदारांना केले आहे.