रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी
करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या शैक्षणिक कालावधीमध्ये स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाड देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येईल.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी विद्यार्थ्यांनाकरिता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. सण 2020-21 व 2021- 22 या शैक्षणिक वर्षाकरिता सदर योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यत वाढविण्यात आलेली आहे. सदर योजनेचे अटी व निकष पूर्ण करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव ता. जी. रत्नागिरी यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य उपलब्ध असून सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन एस एस चिकणे यांनी सहायक आयुक्त रत्नागिरी समाजकल्याण विभागामार्फत केले आहे.
योजनेचा उद्देश :
अनु. जातीचे व नवबौद्ध विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात मर्यादित जागा असल्याने काही विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही. त्यामुळले पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता शासनाने सण २०१६-१७ पासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष :
● सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गाचा असावा.
● त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
● विद्यार्थी महाराष्ट्र्चा रहिवासी असावा.
● विद्यार्थ्यांने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
● विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न २, ५०,०००/- फक्त किंवा जास्त नसावे.
● विद्यार्थी स्थानिक नसावा, (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.)
● विद्यार्थ्याला १०वी व १२ वी मध्ये विद्यार्थ्यास किमान ५०% गुण असणे अनिवार्य असेल.
● अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि मार्यदा ४०% असेल.
● योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने आवश्यक सर्व काकदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.
● विद्यार्थ्यांची निवड गुणवतेच्या आधारे करण्यात येईल.
● विद्यार्थी हा दोन वर्षांपेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेशित असावा.
● विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा काकदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्यास निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची १२% व्याजासह वसुली केली जाईल.
टीप : अपूर्ण भरलेले आवश्यक काकदपत्रे सादर न करता केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही.
लाभाचे स्वरूप :
१) भोजन भत्ता : ₹.२५,०००/-
२) निवासी भत्ता : ₹.१२,०००/-
प्रति विद्यार्थी एकूण देयक रक्कम ₹.३७,०००/-
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२२
सदर योजनेच्या लाभासाठी सण २०२१-२१ व २०२१-२२ आर्थिक वर्षातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या ठिकाणी संपर्क करावा.
– सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव ता. जी. रत्नागिरी.