बुलडाण्यात साकारणार १०५ फुट उंचीचा बाबासाहेबांचा भव्य पुतळा

बुलडाण्यात साकारणार १०५ फुट उंचीचा बाबासाहेबांचा भव्य पुतळा

मलकापूर प्रतिनिधी:करण झनके

बुलडाणा, २१ जानेवारी : स्थानिक जाणीव असावी या प्रमुख हेतुने समाजबांधवांनी डॉ. आंबेडकर नगर येथील नालंदा बुध्द विहारात बुधवार दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये बाबासाहेबांचा १०५ फुटाचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्याचा संकल्प समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला असून सदर पुतळा उभारणीसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून तसेच जे समाज बांधव विदेशात नोकरी, निमित्ताने गेले आहेत त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाण निधी उपलब्ध होणार आहे. बाबासाहेबांच्या १०५ फुट उंचीच्या भव्य-दिव्य मुर्तीमुळे बुलडाणा शहरासह जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे ही बाब जिल्हा वासियांसाठी अभिमानाची आहे. डॉ. आंबेडकर नगर हे चळवळीचे माहेरघर असून शहरात होणाऱ्या जनहिताच्या, समाजहिताच्या आंदोलनामध्ये डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवाशांचा सक्रिय सहभाग असतो. भविष्यात येणाऱ्या पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजहितासाठी व देशहितासाठी केलेल्या कार्याची

हा संकल्प केला आहे. आयोजित बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष खरात उपस्थितीत होते. यावेळी बोलतांना खरात म्हणाले की, सदर पुतळा उभारण साठी माझ्याकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. तर उपस्थित समाज बांधवांना प्रदिप बोर्डे, रविकिरण मोरे, अॅड. संतोष मिसाळ यांनी संबोधित केले याप्रसंगी संदिप बोर्डे, भारतीय बौध्द महासभेचे शहर अध्यक्ष उदय सुरडकर, रविंद्र दाभाडे गुरुजी, सुधाकर आराख, गुलाब खिल्लारे, प्रकाश धुरंधर, अनिल साळवे, जर्नादन सरदार, शाहिर मिसाळ, अभिजित बोर्डे, निलेश मेढे, सागर जाधव, अमोल वानखेडे, रत्नमालाबाई पनाड, शिलाबाई गवई, शांताबाई आराख, कल्पना गवई, लता खिल्लारे, सुजाता लहाने, पुष्पाबाई जाधव यांच्यासह शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन युवानेते विनाद गवई यांनी तर आभार प्रदर्शन मनोज मगर यांनी केले.