कोतवडेत दिव्यांग व्यक्तींना युनिक कार्डचे वाटप

रत्नागिरी : पंचायत समिती रत्नागिरी यांचेकडून कोतवडे गावातील दिव्यांग व्यक्तींना दिलेल्या युनिक कार्डचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत कोतवडे आणि क्षितिज स्पर्श फाउंडेशन कोतवडे यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना प्रमाणपत्र व कार्डचेही वितरण वितरण करण्यात आले.

यावेळी सरपंच तुफील पटेल, सदस्या सौ. प्रीती बारगोडे, ग्रामविकास अधिकारी  देवीदास इंगळे, ग्रामकृती दल समिती सदस्या सौ संयुक्ता मांडवकर,  विलास परवडे, ग्रामस्थ  पांडू वारेकर, महेश कांबळे, व लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.