मुंबई : भारताच्या गानकोकीळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान,त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी चुकीची आहे.अशा बातम्यांना हवा देऊ नका, अशी विनंती मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. प्रतीत समदानी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. ९ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते.दरम्यान, लता मंगेशकर या उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांच्यात किंचित सुधारणा दिसून येत आहे.त्या व्हेंटिलेटरवर नाहीत. तसेच त्या हलकासा घन आहारही घेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.