विना तिकीट प्रवाशाला टीसीने हटकताच ,केली टीसीला मारहाण

रत्नागिरी रेल्वे स्थानकातील प्रकार

रत्नागिरी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीचेशासकीय काम करत असतानाच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मारहाण झाल्याची घटना 21जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
. कृष्णाजीराव नागेश्वरराव
(53, पडवेवाडी कुवारबाव, मिरजोळे, रत्नागिरी) हे नेत्रावत हेएक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळीसंशयित आरिफ समीर खान (19, के. सी. जैन नगर, मारुती
मंदिर रत्नागिरी) हा गेट नंबर 2 ने बाहेर जाताना दिसला.त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली असता मोठमोठ्यानेआरडाओरड करू लागला. मला तिकीट नाही असे म्हणू लागला त्यावेळी टीसी नागेश्वरराव यांनीत्याला कमरेला पकडून टीसी कार्यालयाकडे नेत असताना यावेळी खान याने धकलाबुकलकरूनटीसीच्या शर्टचा खिसा फाडला. व त्यांच्या गळ्यातील चेनतोडून नुकसान केले.