रत्नागिरी : राजापुरात वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

राजापूर तालुक्यातील तुळसवडे माणिक चौकवाडी येथे ग्राहकाचे थकलेले विज बिल वसुलीसाठी गेलेल्या विद्युत सहाय्यक कर्मचाऱ्याला दोघांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

रितेश शांताराम वेलवंडे (25, कुळेवाशी, संगमेश्वर, सध्या रा. सौंदळ, राजापूर), असे मारहाण झालेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते 22 जानेवारी रोजी दुपारी 3.15 वाजता संजय पदमराज कपाळे, शीतल संजय कपाळे (दोन्ही रा. तुळसवडे, माणिकचौक राजापूर) यांच्या घरी व्यावसायिक वीज बिल वसुलीसाठी गेले होते. बिल थकीत असल्याने ते कनेक्शन कट करत असताना संजय व शीतल कपाळे यांनी शिवीगाळ व दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना काठीने ढकलून दिले.
वेलवंडे यांचे दुसरे सहकारी रामचंद्र हातकणकर या घटनेचा व्हिडीओ करत असताना त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. व त्यांनाही धकला बुकल केली.
याबाबतची फिर्याद रितेश वेलवंडे यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार संशयित पती-पत्नी संजय व शीतल यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.