रत्नागिरी : लांजा गावामार्फत २७ जानेवारी रोजी पक्षविरहित जनआंदोलन उभे राहणार

मुंबई-गोवा महामार्गाच्या शहरातील रखडलेल्या कामाबाबत अधिकारी ठेकेदार आणि पर्यायाने शासनाला जाग आणण्यासाठी ‘लांजा बचाव’ चा नारा देत समस्त लांजावासिय एकवटले असून संपूर्ण लांजा गावामार्फत २७ जानेवारी रोजी पक्षविरहित जनआंदोलन उभे राहत आहे.लांजा वासियांच्या हितासाठी हा निर्धार लढा उभा राहत असून याबाबत लांजा गावचे ग्रामदैवत श्री पौलस्तेश्वर मंदिर या ठिकाणी पार पडलेल्या गावच्या बैठकीत या जनआंदोलनाबाबत एकमुखी निर्धार करण्यात आला. लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे.