माणुसकीला काळीमा! कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराने दीड महिन्याचे बाळ पळवले

सातारा : महाराष्ट्रात सावकारी प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. असे असताना सुद्धा काही ठिकाणी खाजगी सावकार ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. सातारायेथील अशाच एक घटनेत सावकरने आकारलेले जादा व्याज कर्जदाराने दिल नाही म्हणून खाजगी सावकराने चक्क कर्जदारचे दीड महिन्याचे बाळ पळवले. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद नोंदवून सुद्धा पोलिस करवाई करायला तयार नसल्याने फिर्यादी हवालदिल जले आहेत.

सातारा येथील मंगलवार पेठेतील दोने कॉलनी येथे राहणाऱ्या अभिषेक कुचेकर यांनी संजय बाबर आणि अश्विनी बाबर या सावकर दांपत्या कडून ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र वर्षभरात त्यांनी बाबर यांना ३० हजाराचे ६० हजार रुपये दिले. एक वर्षात दुप्पट पैसे वसूल करूनही सावकाराने कुचेकर यांच्याकडे आणखी पैसे मागितले आणि ते दिले नाहीत म्हणून त्यांच्या दीड महिन्याच्या मुलीला घरातून उचलून नेले. या घटनेने हादरलेले कुचेकर दांपत्य बाबर यांच्या घरी आपले बाळ मागायला गेले असता त्यांना सावकरने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली, मात्र चार महिने उलटले तरी पोलिसांनी अजूनही कुठली करवाई केलेली नाही. अजूनही ते बाळ त्या सावकाराच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे सावकारी प्रतिबंधक कायद्याला सावकार कशा प्रकारे केराची टोपली दाखवून सामान्य जनतेची पिळवणूक करीत आहेत हेच दिसत आहे.