कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण लाच प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) कडून मास्टर माईंड असलेल्या अधिकारी व मंत्र्यांची चौकशी करण्याची राज्यपाल व केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सर्वसामान्य जनतेची मागणी
कोल्हापूर : दि.२३ लाखो रुपये लाचेची मागणी करण्याचे धाडस पोलीस कॉन्स्टेबलचे होतेच कसे? या पाठीमागे कोण मोठा मासा आहे का?,
याचापण तपास करायला हवा. अनेकवेळा अशा कारवाईमध्ये कर्मचारी सापडतात, पण त्यामागे मास्टर माईंड असलेले अधिकारी मात्र मोकळेच सुटतात.खाकी वर्दीतील चोरांच्या मालमत्तेची चौकशी करावी.लाच प्रकरणात आणखी कोणत्या कर्मचारी,अधिकार्यांचा सहभाग आहे का?
त्यांची चौकशी होणार का?
लाचखोरीत अडकलेल्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का?खाकी वर्दी डागळली; पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची आगामी भूमिका काय ? गेल्या आठवडाभरात लाचखोरीच्या गुन्ह्यात 3 पोलीस कॉन्स्टेबल सापडल्याने पोलीस दलाची प्रतिमा डागाळली आहे. कालच्या कारवाईमूळे लाखो रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या खाकी वर्दीतील चोरांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या विजय कारंडे आणि किरण गावडे या 2 पोलीस कॉन्स्टेबलना शुक्रवारी अँटिकरप्शन विभागाने 10 लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. चार दिवसांपूर्वी देखील आणखी एक पोलीस कर्मचारी लाच प्रकरणात सापडला. आठवडाभरात तिघे पोलीस कर्मचारी लाच कारवाईत सापडल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.
काही लाचखोरामुळं पोलीस दलाची प्रतिमा डागळली आहे. नुकत्याच झालेल्या कारवाई झालेल्या लाच प्रकरणात आणखी कोण अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? त्यांची चौकशी होणार का ? लाचखोरीत अडकलेल्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का?
गलेलठ्ठ पगार असून देखील पैशाच्या हव्यासापोटी लाचेची मागणी करणाऱ्यामुळे सर्वसामान्य लोकांचा पोलिसांवरील विश्वास मात्र कमी होतोय. त्यामुळे यापुढे तरी “सदरक्षणाय खलनिग्रहनाय”हे ब्रीद समोर ठेवून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहतील अशी अपेक्षा आहे.
खरेतर, लाखो रुपये लाचेची मागणी करण्याचे धाडस पोलीस कॉन्स्टेबलचे होतेच कसे? या पाठीमागे कोण मोठा मासा आहे का?, याचापण तपास करायला हवा. अनेकवेळा अशा कारवाईमध्ये कर्मचारी सापडतात, पण त्यामागचे मास्टर माईंड असलेले अधिकारी मात्र मोकळेच सुटतात. स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्यावर पोलीस अधीक्षकांचा कंट्रोल असतो. या घटनेमुळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात फेरफार झाला तरच अधिकाऱ्यांच्या आजूबाजूला सतत घुटमळनाऱ्या चमच्यांची चलती बंद होणार? यापुढे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भूमिका काय राहणार आहे याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.