मलकापूर प्रतिनिधी /उमेश इटणारे
मलकापूर येथील देशगौरव नेताजी सुभाष चंद्रबोस यांची जयंती विविध संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली . येथील तहसील चौकातील नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत पुष्प वाहून नेता जी अमर रहे , भारत माता की जय , वंदे मातरम , चे नारे देत नेताजी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे . त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे लोकनियुक्त नगराध्यक्ष हरीश रावळ , तहसीलदार सुरडकर व न.प. मुख्याधिकारी रमेश ढगे , आरोग्य अधीक्षक योगेश घुगे , प्रमोद अवसरमोल , श्रीकृष्ण भगत , उपाध्यक्ष अजय टप , संजय पाटील व शिक्षक कर्मचारी त्याचप्रमाणे उल्हास शेगोकार , सतीश दांडगे , धनश्री काटीकर , संजय काजळे , रमेश उमाळकर , मिलिंद खंडाळकर , विजय डागा , पत्रकार करणसिंग सिरसवाल , अमोल टप , अजित फुंदे , विनायक तळेकर , बळीराम बावस्कर , आनंद वाघ , अपरेशन तुपकरी , देविदास बोंबटकार , अशोक गावंडे , यासह विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले