सुभाषचंद्र बोस:
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
सुभाषचंद्र बोस, ज्यांना नेताजी म्हणून ओळखले जाते, हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी आणि महान नेते होते.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता.
त्यांचे वकृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरचा आपसूकच त्यांच्याशी आणि पुढे स्वातंत्र्यलढ्याशी जोडला जाई.
नेताजींनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारं असं आहे. म्हणूनच इंग्रजांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धास्ती घेतली होती.
दुसर्या महायुद्धाच्या काळात त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी जपानच्या पाठिंब्याने आझाद हिंद फौजची स्थापना केली.आझाद हिंद फौज स्थापन करण्यात सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीची मदत देखील घेतली.जर्मनीचा हुकुमशहा हिटलर ददेखील सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले होते.नेताजी इंग्रजांच्या तावडीतून सुटले तेव्हा ते
काबुल्,मॉस्को नंतर इटली व जर्मनीत गेले.मुसोलीनी आणि हिटलरची त्यांनी भेट घेतली.त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली.Orlando Mazzota ह्या नावाने ते ओळखले जात होते. जर्मनीमध्ये जर्मन सरकारने त्यांना ‘Free India Radio’ आणि ‘Free India Cente” सुरु करण्यास मदत केली.Free India Center ने ‘जय हिंद’ हा नारा दिला तसेच ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत बनवले आणि हिंदुस्तानीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.सुभाषबाबुंना ‘नेताजी’ किंवा Führer ही उपाधी देण्यात आली.जर्मन सरकारच्या मदतीने ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली व लष्करी शिक्षण भारतीयांना दिले गेले. सुभाषबाबुंनी स्वतः असे लष्करी शिक्षण घेतले.मार्च १९४२ मध्ये जेंव्हा नेताजी हिटलरला भेटले तेंव्हा त्यांनी भारतातही ब्रिटीशांविरुध्द क्रांतिकारक हल्ला करतील व बाहेरुन जर्मन सैन्य व आझाद हिंद सेना हल्ला करेल असे त्यांनी हिटलरला सुचवले. हिटलरने म्हटले की सशस्त्र असे काही हजारांचे सैन्यही काही लाख निशस्त्र क्रांतिकारकाविरुध्द यशस्वीपणे लढा देउ शकते.नंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उपस्थितीत आझाद हिंद सेनेतील सैनिकांना शपथ दिली गेली.त्यामध्ये हिटलरने म्हटले की “तुम्ही आणि तुमचे नेताजी ज्याप्रमाणे स्वतःच्या देशाला परकीय सत्तेला हाकलुन देण्यासाठी ज्या जिद्दीनी प्रयत्न करता आहात त्यावर मी खुष झालो आहे.तुमच्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षाही मोठे आहे.जिथे मी ८कोटी जर्मनांचा नेता आहे तिथे तुमचे नेताजी ४०कोटी भारतीयांचे नेते आहेत.सर्व बाजुंनी ते माझ्यापेक्षा मोठे नेते आणि सेनापती आहेत.मी त्यांना सॅल्युट करतो आणि जर्मनी त्यांना सॅल्युट करते.सर्व भारतीयांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषबाबुंना त्यांचा führer म्हणुन मान्यता द्यावी.मला यात बिल्कुल शंका नाही की सर्व भारतीयांनी हे केले तर लवकरच भारत स्वतंत्र होईल”. जर्मनीचा रशियाने चांगलाच प्रतिकार केल्याने सुभाषबाबुंनी जपानला जाउन त्यांची मदत घ्यायचे ठरवले आणि १३फेब्र.१९४३ साली ते पाणबुडीने जपानला गेले.
जपानमध्ये रासबिहारी बोस या क्रांतिकारकाने आधीच जपानी सरकारच्या मदतीने भारतीयांचे सैन्य उभे केले होते.नेताजी तिथे पोहोचल्यावर त्या सैन्याचे प्रमुख नेताजींना बनवण्यात आले.जपानच्या पंतप्रधान टोजोला नेताजी भेटले.टोजोने भारतीय स्वातंत्र्यचळवळिला पाठींबा दिला. जपान,सिंगापुर ,बर्मा,शहिद्-स्वराज्(अंदमान्-निकोबार्),इंफाळ येथील नेताजींची भाषणे खुप गाजली.जिथेजिथे ते गेले तिथे तिथे त्यांचे भरभरुन स्वागत झाले.५जुलै १९४३ साली आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्विकारले.त्यावेळी त्यात १३००० सैनिक होते.नेताजी म्हणाले की ”आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा दिवस आहे.एक वेळ अशी होती की लोक म्हणत होते की ब्रिटीश साम्राज्यात सुर्य कधीच मावळणार नाही.पण मी असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही.इतिहासानी मला शिकवले की प्रत्येक साम्राज्य अस्तास जाते.ब्रिटीश साम्राज्याच्या थडग्यावर उभे रहाताना आज लहान मुलालाही याचा विश्वास आहे की ब्रिटीश साम्राज्य आता इतिहासजमा झालेय.या युध्दात कोण जिवंत राहील आणि कोण धारातीर्थी पडेल मला माहीत नाही.पण मला हे नक्कीच माहीत आहे की आपण शेवटी जिंकुच.पण आपले युध्द तेंव्हाच संपेल जेंव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या दुसर्या थडग्यावर म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपण परेड करु.हे सैनिकांनो त्यामुळे आपला एकच नारा असला पाहीजे-‘चलो दिल्ली ,चलो दिल्ली’.मी नेहमीच असा विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यास भारताकडे सर्व गोष्ट्टी आहेत्.पण एक गोष्ट नव्हती,ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या सैन्याची.तुम्ही भाग्यवान आहात की भारताच्या पहिल्या सैन्याचे तुम्ही भाग आहात्.”नेताजींना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.लोक स्वतःचे सर्वस्व त्यांना अर्पण करत होते.नेताजींनी अल्पावधीत ४५,००० चे सैन्य उभे केले होते.त्यांना आर्थिक पाठींबाही भरपुर मिळत होता.श्रीमंत भारतीयांना नेताजींनी एकदा म्हटले होते की “तुम्ही लोक मला येउन विचारता की मी ५%-१०% मालमत्ता देउ का?पण जेंव्हा आम्ही सैन्य उभे करतो तेंव्हा सैनिकाला सांगतो की तुझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढ्.त्यांना आम्ही सांगु का की तुझ्या रक्ताच्या १०%पर्यंतच लढ म्हणुन्??गरीब माणस त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई ,फिक्सेड डीपॉझिट्स सर्व काही देशासाठी देत आहेत्.तुम्हा श्रीमंतांपैकी कोणि आहे का जो आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करेल?”.त्यानंतर इंफाळची मोहीम आखली गेली. नेताजी सैन्याला दिल्लीपर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.इंफाळवर हल्लेही सुरु झाले होते.आझाद हिंद सेनेने १५०० चौरस किमी चा भाग जिंकला होता व २५० मैल आतपर्यंत सैन्य घुसले होते.इंफाळ पडणार असे दिसु लागले.पण एप्रिल १९४४ मध्ये चित्र पालटले आणि मॉन्सुनच्या आगमनाने तर मोहिमेवर पाणी फिरवले.त्याचबरोबर जपानकडुन मदत येणेही बंद झाले.इंफाळची मोहीम ही दुसर्या महायुध्दातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक ठरली.भुक्,रोगराई,मृत्यु ,पाउस यांची ती एक दुर्दैवी कहाणी ठरली. नेताजी तेथेही खंबीर होते.कधीही बॉम्बहल्ला झाला की ते म्हणत ‘माझा जीव घेईल असा बॉम्ब अजुन निर्माण झालेला नाही आहे.’
त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा भारताचा राष्ट्रीय घोषवाक्य ठरला आहे. “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा” हे त्यांचे भाषणही त्यावेळी खूप लोकप्रिय होते.
काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की नेताजींनी जपान आणि जर्मनीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रिटीश सरकारने त्यांच्या हेरांना १९४१ मध्ये त्यांना संपवण्याचे आदेश दिले.
५ जुलै १९४३ रोजी नेताजींनी सिंगापूरच्या टाऊन हॉलसमोर सैन्याला “सुप्रीम कमांडर” म्हणून संबोधित केले, “दिल्ली चलो!” घोषणा दिली आणि इम्फाल आणि कोहिमासह जपानच्या सैन्यासमवेत ब्रिटीश आणि राष्ट्रकुल सैन्याने एकत्रितपणे बर्मामध्ये जोरदार मोर्चा काढला.
१९४४ मध्ये आझाद हिंद फौजने पुन्हा इंग्रजांवर हल्ला केला आणि काही भारतीय प्रांत ब्रिटिशांपासून मुक्त केले.
४ एप्रिल १९४४ ते २२ जून १९४४ या काळात कोहिमाची लढाई एक भयंकर लढाई होती. या युद्धात जपानी सैन्याला माघार घ्यावी लागली आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला.
६ जुलै १९४४ रोजी त्यांनी रंगून रेडिओ स्टेशन वरून महात्मा गांधींकडे एक प्रसारण जाहीर केले ज्यामध्ये त्यांनी या निर्णायक युद्धामध्ये विजयाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागितला.
१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.
जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गांधींच्या अहिंसावादी लढ्याला विरोध होता, कारण त्यांचे ठाम म्हणणे होते की रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणे केवळ अशक्य आहे. पण त्यांच्यात केवळ वैचारिक मतभेद होते अन्यथा ते एकमेकांचे चांगले सहकारी होते.
म गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्यात वैचारिक मतभेद होते,असे दाखले मिळत असले तरी उभयतांमधध्ये मतभेत देखील होते.सुभाषचंद्र बोस यांची आक्रमक देशभक्ती, देशनिष्ठा, व इंग्रजांविरुद्ध पुकारलेल बंड नेहरू गांधींना नको होतं.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात नेताजींनी केलेल्या कार्याला दुय्यम स्थान देऊन स्वातंत्र्य आंदोलनाचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न गांधी व नेहरूंकडून झाल्याचा इतिहास देखील उपलब्ध आहे.
नव्या पिढीने जनरल जी.डी. बक्शींचे बोस, द इंडियन सामुराई हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. या धारिका वा कागदपत्रे नुकतीच सार्वजनिक झाल्यामुळे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा यांमुळे भारत स्वतंत्र झाला नसून तो सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजे सावरकरांच्या रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? यातील सत्य आता नव्या पिढीस उमजेल.सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे भारत स्वतंत्र झाला, हे सत्य आता समोर येत आहे.
सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे घाबरून ब्रिटनने भारत सोडला असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील स्पष्ट केले होते।
वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते; पण ते कधीतरी बाहेर येईल. बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेेमुळे इंग्रज घाबरून गेले. गांधीजींच्या अहिंसेमुळे ब्रिटीश भारतीय सेनेवर काही फरक पडणार नव्हता. भारतावरची सत्ता भारतीय सेनेविना दुसरे कुणीच काबीज करू शकणार नव्हते. ते काम सुभाषचंद्रांंनी केले; म्हणून ब्रिटनने भारत सोडला.
सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय सेनेची इंग्रजांविषयीची राजनिष्ठा नष्ट केल्याने इंग्रजांनी भारत सोडल्याचे आणि गांधीजींच्या चळवळीचा इंग्रजांवर नगण्य परिणाम झाल्याचे क्लेमंट अॅटली यांनी देखील स्पष्ट केल्याचा इतिहास आहे.एकंदरीत,सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील अग्रणी होते.इतिहासातील या नोंदीकडे दुर्लक्ष न करता खरा व सत्य इतिहास परत एकदा मांडण्याची गरज आहे.
९५६१५९४३०६