संभाजीनगर येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीला एम आय एम खासदार इम्तियाज जलील त्यांचा जाहीर निषेध
मलकापूर- उमेश इटणारे
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणारे एम आय एम चे खासदार एम्तियाज जलील यांचा उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने निवेदन देऊन दि.24 जानेवारी ला निषेध करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वीर शिरोमणी महाराणा प्रताप, आमचे प्रेरणास्थान व आदर्श आहेत. त्यांच्यामुळेच आज हिंदुस्थानात हिंदू जीवंत आहेत. महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा होणारच.
पुतळ्याला कोणी विरोध केला तर विहिंप बजरंग दल रस्त्यावर उतरेल, असा इशारा या निवेदनातुन आपल्या सेवेशी सादर करीत आहोत
महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याऐवजी सैनिकी शाळा सुरू करा अशी भुमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मांडल्याने त्यांच्या विरोधात सर्व हिंदू समुदायाचा भावना दुखावल्या असल्याने सर्व समाजातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणार इम्तियाज जलिल कोण, महापालिकेने ८७ लाखाचे बजेट तयार करून मान्यता घेतली आहे, नियमानुसार तिथे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा बसवला जाणार आहे, आता केवळ निविदा काढणे बाकी आहे. त्या ठिकाणी पुतळा होणारच आहे. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरूष आहेत आमचे प्रेरणास्थान आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमच्या धर्मावर आकस ठेवून बोलण्याचे काम खासदार करत आहेत. वातावरण खराब करण्याचे ते काम करतात. एमआयएम खासदारांचे राजकारण आता लोकांच्या ध्यानात आले आहे. महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा होणारच. विरोध करताना आपण कोणाला विरोध करतोय हे आधी खासदारांनी समजून घ्यावे त्यांनी इतिहास वाचावा . आपणास निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते की आशा समाजविघातक प्रवृत्तीवर कठोर कारवाई करून आशा लोकप्रतिनिधिना कठोर शासन करावे.
अन्यथा विहिंप बजरंग दल मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारेल,असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री श्रीकृष्ण तायडे, बजरंग दल तालुका संयोजक दीपक कापले, विश्व हिंदू परिषद नगर मंत्री श्यामसिंह हजारी , विश्व हिंदू परिषद तालुका प्रमुख संमती जैन , विहिप शहर उपाध्यक्ष अमर टप , विहिप तालुका उपाध्यक्ष बबलू बैरागी ,बजरंग दल शहर संयोजक रामा महेसरे , बजरंग दल शहर सहसंयोजक रितेश दहिभाते , बजरंग दल संपर्कप्रमुख अक्षय तळेकर ,बजरंग दल गौरक्षा प्रमुख संदीप राजपूत, माजी नगरसेवक गजेंद्र सिंह राजपूत, तालुकाध्यक्ष करणी सेना मंगल सिंग राजपूत , गोपाल सिंह राजपूत, देविन टाक, लव प्रीत मेहरा, यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.